२१ ऑक्टोबर २०१८
मी मारुती शेरकर,
मु. तराळवाडी,
ता. पारनेर,
जि. अहमदनगर.
मी हे अशासाठी सांगतो की
हा मारुती शेरकर हे प्रातिनिधीक स्वरूप आहे. तुम्ही पण एक मारुती शेरकर आहात.
तुमचंही असंच एक कुठलंतरी गाव आहे. कुठल्यातरी कानाकोपऱ्यातून आपण सगळीजण इथं
आलेलो आहोत. व्यवस्थिरित्या आब आणि रुबाब ठेवून मी तुमच्यासमोर उभा आहे. हा जो
प्रवास आहे तो अतिशय विस्मयकारी आहे. ज्या आईवडिलांनी जन्म दिला ते ठार निरक्षर
होते. पण ते माझं विद्यापीठ आहे. कारण त्यांनी मला किंवा आपल्या सर्वांना दिलेली
शिकवण. त्यानंतर या पुरोगामी महाराष्ट्रातले जे महामानव आहेत. ज्यांनी आपल्या
योगदानातून ह्या महाराष्ट्राला एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. ते ही
आपले आईबाबा आहेत. तेही आपले पालक आहेत. त्यांनी आपल्याला सर्वांना इथपर्यंत
आणलेलं आहे. पण आजही आपले लाखो बांधव-भगिनी वंचित आहेत. त्यांना या संविधानाचे ते
फायदे किंवा फळं मिळालेली नाहीत. ते आजही या लोकशाहीचे लाभार्थी नाहीत. लोकशाहीचे
लाभार्थी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. म्हणून ही जी लोकशाही आहे त्याचा जो मुलभूत
गाभा आहे तो म्हणजे आपले संविधान. ती सांविधानिक मुल्ये काय आहेत याचा विसर पडून
कसा चालेल? आपल्याला त्या संविधानिक मूल्यांचा आधी अभ्यास
आणि नंतर अंगीकार करून आपल्याला अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन घडवून आणायचे
आहे. त्यासाठीच तर हे अभ्यास शिबिर आयोजित केलेले आहे..
एक अमेरिकन इतिहासकार हॅले
नावाचे गृहस्थ, त्यांनी असं म्हटलंय की, “Coming
together is beginning, keeping together is progress & working together is
success.” हे जे successively success आहे हे केवळ आपल्या एकत्र येण्यातून होणार आहे. कारण ते एकत्व, ते भारतीयत्व काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपला जो एक certain
comfort zone आहे. comfort zone म्हणजे की एक नाईन टू फाइव जॉब असतो. हॅन्ड टू माऊथ आपलं सगळं मॉर्निंग
आणि स्पेंडींग सगळं आलबेल चाललेलं आहे. मग हे जे काही वेड आहे, असं म्हणतात It is wise to be mad for some purpose या जगाला शहाणं जर कोणी केलं असेल ना? तर ते
ह्या वेड्या लोकांनीच. एक certain madness त्यांच्याकडे
होता. certain insight त्यांच्याकडे होती. sight सगळ्यांकडं आहे what about insight?. एक Mindset त्यांच्याकडे होतं. एक dream होतं आणि ती
एक ideology होती. ते स्वप्नं, त्याची फळं चाखायला किंवा ते बघायलाही ते नाहीत. पण त्यांनी हे जे काही
वेड होतं. म्हणजे तुकोबा असतील, शिवबा असतील, फुले-आंबेडकर, शाहू महाराज असतील. त्या त्या
लोकांनी त्या त्या काळात बघितलेलं ते एक वेड होतं. मग संविधान म्हणजे नेमकं काय? तर या सगळ्या आशा आकांक्षाचा अर्क आहे, नवनीत
आहे. आपल्या सगळ्यांच्या स्वप्नांचं ते प्रतिक आहे. त्यामुळे हे जे काही आपण आज या
सभागृहामध्ये छान, अगदी सुटबुट जरी नसला तरी ज्याला आपण
एक living standard म्हणतो ते आपण maintain करत आहोत. म्हणून आपल्याला हे social किंवा
थोडीशी आपली commitment to society, pay back to society. म्हणजे आपण ऋणात असणं. कशाकशाच्या ऋणात असायला हवं? असं आहे की, gratitude is a memory of heart आपल्या
हृदयाची आपल्या काळजाची ती भाषा असते. Thanks म्हणणं.
मग तो निसर्ग असेल, आपली जडणघडण करणारा.
हे संविधान समजून
घेण्यापूर्वी आपल्याला काही ज्या मूलभूत गोष्टी आहेत ज्याला आपण समाजभान म्हणतो.
समाजभान येण्यासाठी आधी आत्मभान यावं लागतं. आपण सगळे भानावर आहोत म्हणून इथं
पोहोचलो आहोत. भान येणं, हे आत्मभान म्हणजे काय? ते आत्मभान येण्यासाठी आधी आपल्याला आत्मसन्मान, self
respect की जसं संविधानामध्ये dignity of an
individuality म्हटलेलं आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा. पण
तत्पूर्वी मला मी स्वतः प्रतिष्ठीत समजतोय का? Education gives us
knowledge, knowledge gives us confidence & confidence gives us
respect या वाटेवर मी आहे का? फुल्यांनी
जे म्हटलं की, त्या एका अविद्येने सर्व अनर्थ केलेले
आहेत. बलुतंकार दया पवार कोंडवाडा कवितेत असं म्हणतात, “असतो
नर्मदेचा गोटा तर असल्या इंगळ्या डसल्या नसत्या.” मला
माणूसपणाची जाणीव झाली. म्हणजे मला आत्मभान आलं. आत्मसन्मान मिळाला आणि मग मी
गावकुसाबाहेर का आहे? किंवा मी का वंचित आहे? मी या इंडियामध्ये कधी प्रवेश करता होणार आहे? ज्या
१% लोकांकडे जवळपास ७०% संपत्ती आहे. या भारताच्या स्वातंत्र्याच्या ७०
वर्षांनंतर. तर मी या भारतातला एक शेवटचा किंवा सामान्य किंवा असा एक फाटका माणूस
का आहे? आपण तिथून आलेलो आहोत. आपली पहिली पिढी आहे, गाव सोडून आपण जगायला आणि चांगलं जगायला. चांगला माणूस अधिक समृद्ध
प्रबुद्ध माणूस म्हणून माणसात आलो. तर हा कोणता प्रवास आहे? कुठून आणि कसा हा प्रवास सुरु झाला? तर
आपल्याला कुठंतरी जागं व्हायचं आहे. आपल्याला भानावर यायचं आहे. म्हणून हा सगळा
खटाटोप आहे. कारण आपण बघतो की एक आत्मस्तुती किंवा आत्मसमर्थन, सेल्फ जस्टीफिकेशन, मी कसा बरोबर आहे आणि मग नंतर
आत्मरंजन म्हणजे स्वतःला खूष ठेवणं. मग त्यातून कुठेतरी एक फॉल्स इमेज तयार होते.
त्या फॉल्स इमेजमध्ये आपलं आयुष्य पुढे पुढे जात राहातं. म्हणजे मी फेडरेशनचा
चेअरमन आहे, मी डायरेक्टर आहे, मी मी मी.. त्या मीपणातून मी खराखुरा कोण आहे? हे
जग, हे जगणं हे समजून घेण्यासाठी आपल्याला सांविधानिक
मूल्ये जर चांगली लक्षात आली तर नक्कीच आपल्या जीवनाला एक वेगळा अर्थ प्राप्त होईल.
संविधानाकडे जाण्यापूर्वी
आणखी एक गोष्ट मी तुम्हाला पालकत्वाची सांगत होतो. जे महापुरुष आहेत. म्हणजे देव
आपल्या श्रद्धा देतात. संविधानामध्ये उपासनेचं स्वातंत्र्य आहे. त्याहीपेक्षा
जेव्हा प्रेरणा, म्हणजे certain belief विश्वास ह्या सगळ्या गोष्टी संविधानाने आपल्याला बहाल केलेल्या आहेत. मला
कोणतंही विवादात्मक विधान करायचं नाही. पण जेव्हा आपल्या आजूबाजूला काय घडतंय? जेव्हा समाजभान या विषयावर आपण बोलतोय तेव्हा उल्लेख केलाच पाहिजे.
शबरीमाला मंदिरामध्ये आजही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सलग आठ दिवस तिथं
संचारबंदी आहे. आपल्या आयाबहिणी आणि लेकीबाळी नाही जाऊ शकत तिथे. १० ते ५०
वयोगटातील या रजस्वल महिलांना इथल्या महिलांनीच अडवलंय. म्हणजे मासिक पाळी अपवित्र
आहे हे महिला सांगतायत. म्हणजे त्यांना आत्मसन्मान नाहीए. त्यांना त्यांची ओळख
नाही स्वतःची, त्या स्त्रीत्वाची. म्हणून या घटना घडत
आहेत. परवा पिंपरी चिंचवडला दसऱ्याच्या आदल्या दिवशी ऐश्वर्या नावाची कांजारभाट
समाजातली ती मुलगी नवरात्रात माहेरी आली होती. त्या तेविस वर्षाच्या मुलीने जे
काही वर्षा दोन वषापूर्वी लग्न केलं, कोर्ट मॅरेज केलं.
तेव्हा तिथं योनिसूचिता आणि कौमार्यभंग असे विषय निर्माण झाले. कौमार्य चाचणीला
तिने विरोध केला. म्हणून त्या जातपंचायतीने तिला बहिष्कृत केलं. ती परवा माहेरी
आली. चालली गरब्याला गेली तिथे. तिथल्या लोकांनी गरबाच बंद करून टाकला. कारण ती
बाहेर जात नव्हती. शेवटी ती पोलीस ठाण्यात गेली. म्हणजे सांविधानिक मूल्ये काय
आहेत? स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय?
equality म्हणजे काय? जर आपण
संविधानातली ही जी काही मूल्ये आहेत ती जर आपण बघायची म्हटलं तर आपल्याला हे भान
येणं फार आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे? माझ्या
मनामध्ये काय गोंधळ आहे का? संभ्रमावस्था आहे का? मघाशी मी माझ्या मित्रासोबत बोलत असताना म्हटलं, सॉक्रेटीस एक म्हणायचा की, “I know.. that I don’t know..” हे जग म्हणजे आपल्याला.. मूळात कळतं केव्हा? की
आपल्याला ठार कळत नाही हे तरी कळलं पाहिजे ना? काय आहे
जग? जेव्हा कळत नाही हे आपल्याला कळतं आणि तिथून
आपल्याला कळायला सुरूवात होते. आपल्याला खूप समस्या आल्या म्हणजे आपल्या मनामध्ये
अनेक समस्या, अनेक कुतूहल असली पाहिजेत. म्हणून इथं
बाबासाहेबांनी जसं म्हटलंय की या जगात दोनच जाती आहेत. एक स्त्री आणि दुसरा पुरुष
आणि एकच धर्म आहे तो म्हणजे मानवता. हे काम आपल्याला पुढं न्यायचंय. तर हे आपल्या
आजूबाजूला जे काही घडतं आहे आणि मग याच्या मूळाशी जर आपण गेलो तर या महापुरुषांनी
आपल्याला जे काय पुरोगामीत्त्व बहाल केलेलं आहे. मग ते ज्ञानोबा तुकोबा असतील, कबीर असतील , चार्वाक असतील ह्या सगळ्या
लोकांनी त्या काळात बघितलेल्या स्वप्नांचं हे प्रतीक आहे किंवा आरसा आहे असं
समजूया. आता ते हवे होते हे सगळं बघायला. मग एक कडाडती वीज किंवा कळसाध्याय जो
बाबासाहेबांच्या रुपानं जे मनाला माणुसकीकडं घेऊन जाणारं, शरीराला श्रमाकडं घेऊन जाणारं, बुद्धीला
सत्याकडं नेणारं अशी जी काही विचार प्रक्रिया.. thought process त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजे मूलभूत संकल्पना स्पष्ट केलेल्या
आहेत. आपलं जगण्याचं सार त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून संविधान या masses पर्यंत.. आता हे masses म्हणजे काय? तर आपण बघतो झेंड्यांचे कलर्स वेगवेगळे आहेत. कुणाच्या हातात आणखी काय दगड
पण असू शकतो. कोणाच्या खांद्यावर काय? आपल्या
महाराष्ट्राचे अजून एक living legend आहेत डॉ. आ.
ह. साळुंखे. ते म्हणतात तुमच्या खांद्यावर तुमचंच डोकं आहे काय? म्हणजे आपल्या खांद्यावर डोकं कुणाचं आहे हा प्रश्न पडतो. मग कुठेतरी ही
शिक्षण व्यवस्था नापास झालेली आहे काय? आपल्याला
घडवणारी ही संस्कृती नापास झालेली आहे काय? आपण कुठे
आहोत? तर हे जे masses आहेत
ना त्यांना many asses असं म्हटलं जातं. त्यांना
कसं divert करायचं? कुठं
न्यायचं? काय असतं.. एक नेतृत्त्व असतं. ते एक वेडेपण
असतं. त्यांना ते स्वप्नं पडलेलं असतं. मग ते जर विधायक असेल, रचनात्मक असेल जसं संविधान आहे. संविधान ही संरचना आपलं जगणं आपल्या समोर
मांडतं.. जसं महात्मा गांधी असं म्हणायचे, की तुमचे
हेतू शुद्ध असावेत आणि हेतू साध्यतेचे मार्गही तितकेच शुद्ध असावेत. म्हणजे my
life is my message म्हणजे इतकं त्यांचं.. सत्याचे प्रयोग
किंवा सत्य आणि अहिंसा ती तत्वे जगप्रसिद्ध आहेत. आइन्सटाईन असं म्हणायचे, जगामध्ये असा गांधी नावाचा माणूस होऊन गेला असेल यावर पुढच्या पन्नास
वर्षांनंतरची पिढी विश्वाससुद्धा ठेवणार नाही. तर हे जे काही वेगवेगळ्या धारेची
विचारधारेचे लोक आहेत ज्यांना आपण masses म्हणतो
हे raw material आहे. आपल्याला त्याला कुठेतरी एका organizational पातळीवर.. मग त्याच्या काही ideologies आहेत.
आपल्याला त्या विषयावर आज बोलायचं नाही. पुन्हा केव्हा तरी त्या विषयावर बोलू आपण.
म्हणजे जे काही प्रोग्रॅम, पॉलिसीज, डिसीप्लीन, लिडरशीप, अॅक्टीव्हीस्ट या विषयावर आपण नंतर बोलू.
आज आपल्याला या सांविधानिक
मूल्ये किंवा ज्या तरतूदी आहेत. कारण आपण सर्वजन या लोकशाहीचे लाभार्थी आहोत. ही Democracy
is not an object but it is an instrument, it’s a tool to achieve our
objectives. हे कोणते objectives आपल्याला achieve करायचे आहेत? आपण सारे भारतीय आहोत. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.
ही प्रतिज्ञा प्रत्येकाने म्हणजे.. आपण कधीतरी शाळेत गेलो तेव्हा सुद्धा ती
प्रतिज्ञा होती. अलिकडे प्रतिज्ञेनंतर सरनाम्याची त्यात भर टाकलेली आहे. मग हा
संविधानाचा जो सरनामा आहे, उद्देशिका आहे, प्रस्ताविका आहे. म्हणजे तो ट्रेलर आहे. सिनेमा पुढे आहे. म्हणजे आपल्याला
कलमं सगळी अभ्यासालीच पाहिजे असे नाही तर ते गरजेनुसार आपण नंतर बघू किंवा ते
वैयक्तिक पातळीवर आपल्याला करता येईल. एकदा संविधान का जाणून घ्यायचं? का अभ्यासायचं? हे एकदा कळलं की ते काम कसं
करायचं हा मुद्दा गौण ठरतो. That is methodology. I am talking about
some ideology एक mindset. आपल्याला
हे का करायचं आहे? ते जाणून घ्यायचं आहे. मग हा जो भारत
विरुद्ध इंडिया. हा स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर भारत विरुद्ध इंडिया आणि ही
जी विषमता आहे. सगळ्या बाबतीतली ती जर मिटत नाही. म्हणजे बाबासाहेब तेव्हा संविधान
सुपूर्द करताना म्हटले होते, प्रचंड विसंगती आहे इथे
आणि या विसंगतीपूर्ण अवस्थेत हे संविधान आपण आपल्यालाच अर्पण करत आहोत. We
the people of India म्हणजे आम्ही भारतीय लोक. हे कोणा
ईश्वराला किंवा आणखी एखाद्या राष्ट्रपित्याला पण ते अर्पण केलेले नाही. आम्ही
भारतीय लोक. आम्ही भारतीय लोक म्हणजे काय? तर आपल्याला
ती जी ओळख होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. संविधान देशाला देशाप्रती ते अर्पण
करत असताना तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, विसंगती
आहे. Full of contrast आहे. म्हणजे एक विशिष्ट जात
काहीतरी गू-घाण डोक्यावर घेऊन मैला वाहते आहे. दुसरे लोक कुठेतरी मॅजिस्ट्रेट
आहेत. तर त्याच्या ह्या श्रमाला प्रतिष्ठा काय आहे? काय
आहे हे? कसली विषमता आहे? जर
वंचितांना न्याय मिळत नसेल तर कदाचित ते हे संविधान अमान्य करतील. मी जर जिवंत
असेल तर मी त्या वंचितांच्या बाजूने असेल. असं डॉ.बाबासाहेब म्हटलेले आहेत. म्हणजे
ते संविधान यशस्वी करायचं की नाही हे या सर्व आम्हा भारतीयांवर अवलंबून आहे.
मग या लोकशाहीच्या
संदर्भात.. जसं अथेंसमध्ये सॉक्रेटीसने सांगितलं की दोनच जाती होत्या एक गुलाम आणि
दुसरा मालक. आपल्याकडेही शेकडो राजे होते आणि राजेशाही होती. सरंजामशाही होती.
आजही ती सनातनी वृत्ती आपल्याकडे बर्याचजणांच्या डोक्यात आहे. म्हणजे कुठल्यातरी
सो कॉल्ड उच्च वर्णात जन्माला आले म्हणून ती सनातनी वृत्ती येते असं नाही. जेव्हा
एक ऐहिक सुखं, पैसा किंवा इतर काही भौतिक गोष्टी आपल्या
पायाशी लोळण घेतात तेव्हा आपण अचानक उडी मारतो वरच्या वर्गामध्ये, वरच्या वर्णामध्ये. म्हणजे इथं कुठल्या जातीला, धर्माला आपल्याला काही नावं ठेवायची नाहीत. ही बिरादरी पैसे असणारांची
म्हणजे श्रीमंतांची आणि दुसरीकडे गरिबांची. तर हा जो काही भेद आहे त्या भेदावर
आपल्याला काम करायचंय.
बोलत होतो लोकशाहीवर. जे
लिंकनने म्हटलं, For the people, by the people अशी जी काही system आहे. आता हे buy the people असं म्हणायची
वेळ आलीय. आजही पुन्हा एकदा आपण असं म्हणूया की एवढ्या वर्षानंतर मतं जर विकली जात
असतील. म्हणजे ज्या संविधानानं आपल्याला एक मत एक मूल्य दिलंय. ते मत अक्षरशः
विकलं जातं. ठार आडाणी लोक त्यांचं एकवेळ आपण समजू शकतो. त्यांना काय साडी दिली, चोळी दिली, धोतर दिलं. जगण्यासाठी त्यांना ती
गरज आहे. त्यांच्या पोटाची गरज आहे. पण जेव्हा शिकलेली लोक.. म्हणून मी म्हटलं
शिक्षण व्यवस्था नापास झालेली आहे काय? शिकलेली माणसं
जर आपलं मत विकत असतील? मत विकणं म्हणजे आत्मा विकणं.
स्वतःचं आत्मभान विसरणं. मी विकायला काढलंय स्वतःला. अशी जी काही अवस्था.. मग मला
मत नाही. मत म्हणजे opinion.. मला काय वाटतं?
What do you mean? What is my opinion? What according to you? मला काहीच वाटत नाही? कुठंतरी आपण
अंमलबजावणीमध्ये कमी पडत आहोत.
या लोकशाहीचे आपण सारे
लाभार्थी जर आहोत तर ही लोकशाही आपण समजून घेतली पाहिजे ना? तिचे जे काही चार स्तंभ आहेत. ते सर्वोच्च न्यायालय आहे. ज्या न्यायालयाने
हस्तक्षेप केलेत अनेक ठिकाणी. कारण संविधानात तशी तरतूद आहे. जेव्हा सुरक्षा, न्याय, समता या गोष्टींना जर बाधा येत असेल तर
सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं. म्हणजे त्या शबरीमाला प्रकरणामध्ये
उच्च न्यायालयातील एक न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी असं म्हटलं की, नको बाबा तिथं धार्मिक काही स्वयंभू संस्था आहेत त्या, त्यांच्यात आपण नाही हस्तक्षेप करायचा. एका सर्वोच्च न्यायालयाचे
न्यायाधीश पण असं म्हणतात. म्हणजे जिथं स्त्री-पुरुष समता, समानता, gender equality चा विषय येतो. तर इथं
ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागेल. मग मीडिया असेल, मग तो इलेक्ट्रॉनिक आहे किंवा हा प्रिंट मीडिया आहे. त्यानंतर कायदेमंडळ
आहे. म्हणजे संसदीय लोकशाही आपली. कायदे बनवणारी संसद आहे. हे नोकरशहांचं जे काही
कार्यकारी मंडळ आहे. या सर्व सांविधानिक संस्था आहेत. मग हा जो देश आहे विविधतेनं
नटलेला. या देशाचं एकत्व किंवा आपल्याला जे भारतीयत्व दिलंय. बाबासाहेब म्हणायचे
की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे. कारण जेव्हा प्रादेशिक वाद
निर्माण झाले. मी मराठी आहे, मी आसामी आहे, मी बंगाली आहे. मी भारतीय आहे.. नाही का? अशा
वेळेला भारतीयत्वाची म्हणून जी एक ओळख आहे. जे नागरिकत्त्व आपल्याला बहाल झालेलं
आहे. कारण पूर्वी राजा होता, प्रजा होती. गुलाम होते.
हे सगळं संपुष्टात आलं. एका फटक्यात. संविधानाच्या एका आसूडानं एका तडाख्यानं आपण
सगळे भारतीय झालो. आपण सगळे नागरिक झालो. हे जे काही मूलभूत हक्क, अधिकार आपल्याला जे मिळालेले आहेत. ते जाणून घेताना हे संविधान..
त्यावेळेला जी बॅरिस्टर लोक होती. जवळपास शंभरेक लोक बॅरिस्टर होते. त्याच्यामध्ये
महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद ही सगळी बॅरिस्टर मंडळी होती. या जवळपास ९०% सवर्ण लोक होते
१०% ओबीसी एससी मायनॉरिटी या लोकांचा त्यात सहभाग होता. बाबासाहेबांनांही
तिथपर्यंत जाण्यासाठी खूप खटपट करावी लागली. परवा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर
असं म्हटले की या देशाने दोन महापुरुषांना विसरता कामा नये. त्यामध्ये निश्चितच
बाबासाहेब आहेत. पण त्यांनी महात्मा गांधींजींचं नाव घेतलं. त्याचं कारण असं आहे
की घटना समितीमध्ये पंडित नेहरूंना त्यांनी सूचना केल्या होत्या. हे मसूद्याचं जे
काम आहे हे बाबासाहेबांकडं द्या. कारण ही माणसं दिलदार होती. ती वाचक होती अभ्यासक
होती.
एक प्रसंग सांगतो मी. जेव्हा
पंडितजींना एक संदर्भ हवा होता. त्यांच्या पीएनं सांगितलं की हा संदर्भ हे पुस्तक
केवळ आपल्या बाबासाहेबांकडं मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी
राजगृह बांधलं आणि सगळ्यात जास्त म्हणजे संसदेच्या लायब्ररीमध्येही जी पुस्तके
नाहीत ती त्याकाळी बाबासाहेबांकडं होती. पंडितजींनी त्यांच्या पीएला सांगितलं जा
म्हणे ते पुस्तक घेऊन ये. ते पुस्तक मागण्यासाठी बाबासाहेबांकडं ते गृहस्थ आले.
बाबासाहेब म्हटले की, हा मी येऊ शकेल एकवेळेस पण माझं पुस्तक नाही
जाऊ शकत त्यांच्याकडे. त्यांना हवा असेल संदर्भ तर त्यांनी इथं यायचं आणि ते
अभ्यासायचं. पंडित नेहरू पण तेवढेच दिलदार होते. त्यांनी व्यक्तिगत असं घेतलं नाही
ते. कारण दोघेही व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचा मानत. तिथं विभूतीपूजेला स्थान
नव्हतं तर विचाराला स्थान होतं. पंडितजी स्वतः बाबासाहेबांकडे आले, चहापान झालं. हास्यविनोद झाले, चर्चा झाली आणि
ते निघून गेले. म्हणजे आज आपण जे राजकारणात बघतो किंवा सामाजिक जीवनामध्ये आपण
मतभेदातलं सौंदर्य विसरलेलो आहोत. चर्चा करायचं सौंदर्य विसरलेलो आहोत. आपण गोळ्या
घालायला लागलो. माणसं संपवायला लागलो आहे. फार प्रचंड वाईट अवस्था आहे. इथे या
स्टेजवर आपल्याला पक्ष.. पक्ष म्हणजे विचार.. आपला पक्ष कोणता आहे? आपला विचार कोणता आहे? तर भारतीयत्व. ही
संविधानाची जी काही अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी आपल्या या लाखो करोडो लोकांच्या
आशा आकांक्षा ज्या आपल्या या सांविधानिक मूल्यांद्वारे व्यक्त झालेल्या आहेत. ही
जी काही मूल्ये आहेत. समाजवाद. संपत्तीचं असं न्याय्य वाटप व्हावं. म्हणजे
मार्क्सने जे साम्यवाद किंवा समाजातल्या कुणा एकाची उंची वाढता कामा नये. तर
सर्वांची उंची थोडी थोडी का असेना वाढावी असे आग्रही मत मांडले. चीनमध्ये तो काही
अंशी साम्यवाद यशस्वी झाला. रशियामध्ये हा साम्यवाद फेल गेला. कारण लोकांना त्या
लोकशाहीचं.. विशेषतः भांडवलशाहीचं आणि उदारमतवादाचं जास्त आकर्षण आहे. पण
कल्याणकारी राज्य ही जी संकल्पना आहे. ती या समाजाची मालकी. जे फ्रेंच
राज्यक्रांतीची जी काही मुलतत्वे आहेत. १७८९ ला ज्यावेळेला व्हाल्टेयर, रुसो, रॉबेस्पिअर, मॉन्टेस्क्यू
या मंडळींनी जे मूलभूत विचार दिले. आपल्या संविधानामध्ये जगातल्या सगळ्या
राज्यरचना राजेशाही पासून लोकशाहीपर्यंत.. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे. तर
याचा सगळ्यांचा विचार झालेला आहे. secularism ही
संकल्पना नेमकी काय आहे? ही जी सांविधानिक मूल्ये आहेत.
शाळांशाळांमधून त्या मुलांना शिक्षकांनाही त्याची जाणीव नाही. म्हणून आपल्यापर्यंत
ते रुजलं नाही, जे पोहोचलं नाही. या सरकारला कोणताही
धर्म नाही. म्हणजे काय आहे हे? व्यक्तीला धर्म असू
शकतो. कारण त्याला उपासनेचं स्वातंत्र्य आहे. मात्र सरकारला असा कोणताही धर्म
नाही. सरकार कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही. सर्व धर्मीयांसाठी समान
वागणूक आहे. तर मला असं वाटतं की मी आता हे जे काही मोठी मंडळी इथं आलेली आहेत. तर
मी माझं बोलणं थोडं आटोपतं घेतो. आपण इथं आलात.. फक्त मला जे काही एक भान आहे. मी
शबरीमालाचं उदाहरण दिलं, समाजभान म्हणत होतो. लोक
व्यक्तीपूजेकडं चाललेले आहेत. विभूतीपूजा होते आहे. मत विकलं जातं आहे. असं आहे की
जर व्यक्तीपूजा आणि विभूतीपूजा झाली तर आपण हुकूमशाहीकडे जातो आहोत हे ही आपल्याला
संविधानकर्त्या बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे. लोक असा आक्षेप घेतात की हे
संविधान अलिकडचं आहे, ५० वर्षांपूर्वीचं. आमचा धर्म
आमची संस्कृती आमचं सारं काही फार पूर्वीचं आहे म्हणे. आमच्या घटना आमचं संविधान
वेगळंच आहे. तर आपल्याला जे काही भारतीयत्व, नागरिकत्व, एकत्व या संविधानाने बहाल केलेलं आहे. ते आपण जपूया. ते जपण्यासाठी त्याचं
संवर्धन करण्यासाठी त्याबाबत आपण स्वतः साक्षर होऊयात. ते काय आहे हे सगळं समजून
घेऊया. इतर सगळ्यांना शहाणं करून सोडूया. धन्यवाद..🙏
मारुती शेरकर.
No comments:
Post a Comment